बातम्या

जळगावमध्ये खुलेआम तलवारबाजी, पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन!

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील सम्राट कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव धीरज दत्ता हिवराळे (वय २२, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे असून, या तरुणाविरुद्ध यापूर्वीही दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सम्राट कॉलनीतील हूडको समोर एक तरुण हातात तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करत आहे, अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली.

पथक घटनास्थळी पोहोचले असता, धीरज हिवराळे हा तलवार हातात घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे आणि रविंद्र कापडणे यांनी संयुक्तरित्या केली.

पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!