बातम्या

उद्योगांसाठी महत्त्वाची बैठक; MIDC व विविध विभागांशी सकारात्मक चर्चा

दि. ०९ जून २०२५ रोजी जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) प्रादेशिक कार्यालयात, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत जळगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी महावितरण, मनपा, MIDC या संबंधित विभागांशी निगडीत अनेक समस्या मांडल्या. मुख्यत्वे करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता, वारंवार येणारे वीजपुरवठा खंडित होणे, नवीन विद्युत सबस्टेशन उभारणी, नियमित व रोटेशन पद्धतीने कचरा संकलन, नवीन रस्त्यांचे प्रस्ताव, विद्यमान रस्त्यांची दुरुस्ती, बंद पथदिव्यांची देखभाल व नव्या प्रकाशव्यवस्थेची गरज, तसेच दुषित पाणीपुरवठा यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चासत्र झाले.

या चर्चेदरम्यान विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उद्योजकांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर सकारात्मक कृती करण्याचे आश्वासन दिले. ही बैठक फक्त तक्रारी नोंदविण्यापुरती न राहता, कृती आराखड्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरली.

या बैठकीस महावितरणचे श्री. मुलाणी साहेब व श्री. विनोद पाटील, MIDC चे विभागीय अधिकारी श्री. घाटे साहेब, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. गोसावी साहेब, अयोग्यधिकारी श्री. उदय पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. चेतन पाटील साहेब व श्री. डोंगरे साहेब, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. राजपूत साहेब, मनपाचे शहर अभियंता श्री. आर. टी. पाटील साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच उद्योग भारतीचे अध्यक्ष श्री. संतोष इंगळे, तसेच श्री. समीर साने, श्री. रवींद्र फालक, श्री. महेंद्र रायसोनी, श्री. किशोर ढाके, श्री. दीपक चौधरी यांच्यासह जळगाव औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रमुख उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही बैठक उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, भविष्यात औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी योग्य दिशा मिळवण्यासाठी प्रशासन व उद्योजक यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!