पुण्याला निघालेली ट्रॅव्हल्स उलटली – भीषण अपघातात प्रवासी जखमी!

भुसावळ (प्रतिनिधी) | दि. १ जून:
भुसावळहून पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस आज रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ भीषण अपघातग्रस्त झाली. बस पलटी होऊन रस्त्यावर उलटली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी पुढे येत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
प्राथमिक माहितीनुसार, गारखेडा परिसरात रस्त्याचे दुभाजक काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय झाला आहे. याच कारणामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही.
अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलसह जामनेर व जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बसमध्ये नेमके किती प्रवासी होते व कितीजण गंभीर जखमी झाले याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता गंभीर जखमींची संख्याही लक्षणीय असण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू असून, दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
One Comment