बातम्या

प्रा. मनीष मानकर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर

मलकापूर (प्रतिनिधी) – पश्चिम विदर्भात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२५ यंदा प्रा. मनीष मानकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दिला जात असून, संस्थेच्या विकास आणि संशोधन समितीच्या बैठकीत प्रा. मानकर यांची निवड करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य, विद्यार्थी कल्याणासाठी घेतलेले उपक्रम, तसेच ग्रामीण भागात सामाजिक जागृतीसाठी त्यांनी दिलेले योगदान यामुळे त्यांची निवड अत्यंत योग्य ठरल्याचे समितीच्या सदस्यांनी नमूद केले.

या गौरवाच्या निवडीनंतर प्रा. मनीष मानकर यांचे सर्व स्तरांतून – सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्था – यांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि कार्यप्रवृत्ती हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

सन्मान वितरण सोहळा जून २०२५ मध्ये अकोला जिल्ह्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.

कार्यक्रमाबाबतची अधिकृत माहिती, निमंत्रणपत्रे आणि उपस्थित मान्यवरांची यादी लवकरच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन तर्फे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. राजेश पाटील ताले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!