बातम्या

रावेरमध्ये मोठा वनविभागाचा छापा! 5.73 लाखांचा लाकूडसाठा जप्त

जळगाव, दि. 5 मे:रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ दिनांक 5 मे 2025 रोजी करण्यात आली.

गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रावेर-चोरवड रस्त्यावर संशयित वाहने अडवण्यात आली. तपासणीदरम्यान MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक व MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आले. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले.

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 5,73,400 रुपये इतकी होते. सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडलेला असल्याने रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

जप्त केलेली दोन्ही वाहने व लाकूडसाठा पुढील कार्यवाहीसाठी मध्य प्रदेश वनविभागाच्या युनुस दाऊदी (वनपाल), आर. डी. काजळे (वनरक्षक) आणि वीरेंद्र कुमार (वनरक्षक) यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला.

ही कारवाई नीनू सोमराज, वनसंरक्षक (प्रा.), वनवृत्त धुळे; श्री. जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल; श्री. आर. आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता), धुळे; आणि श्री. समाधान पाटील, सहा. वनसंरक्षक, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर मोहिमेत वनपाल अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडले खु.), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी व वाहनचालक विनोद पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!