गोरखनाथ बागुल यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह

जळगाव : जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ आणि निस्वार्थ सेवेबद्दल प्रसिद्ध असलेले गोरखनाथ बागुल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांच्या वतीने “पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह” प्रदान करण्यात आले. हा सन्मान त्यांना महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या विशेष सन्मान कार्यक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक हेही उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
गोरखनाथ बागुल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले योगदान, त्यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धती, आणि समाजहितासाठी दाखवलेली तत्परता यामुळे त्यांना हा मानाचा सन्मान बहाल करण्यात आला.
या गौरवामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे सहकारी, मित्र, ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
– हार्दिक अभिनंदन गोरखनाथ बागुल!