नोकरी

भुसावळ पाणीपुरवठा विभागातील तिघे लाच घेताना रंगेहाथ अटकेत

जळगाव (दि. 23 एप्रिल 2025) – भुसावळ पाणीपुरवठा विभागातील तिघा कर्मचाऱ्यांनी प्लंबरकडून लायसन्स नूतनीकरणासाठी लाच मागितल्याची माहिती मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau – ACB) केलेल्या सापळा कारवाईत सदर तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

कारवाईचे ठळक तपशील :

  • युनिट : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
  • तक्रारदार : 46 वर्षीय प्लंबर, लायसन्स नूतनीकरणासाठी विभागात गेले होते.

आरोपींची नावे व हुद्दे :

  • 1. शाम समाधान साबळे (वय 28) – कंत्राटी कामगार, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ नगर परिषद
  • 2. सतीश सुरेशराव देशमुख – वर्ग 3 अभियंता, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ
  • 3. शांताराम उर्खडू सुरवाडे (वय 57) – वर्ग 4 लिपिक, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ—

 

लाचेची मागणी आणि स्वीकार :

  • मागणी केलेली रक्कम : 700 रुपये
  • स्वीकारलेली रक्कम : 600 रुपये
  • मागणी व स्वीकृती दिनांक : 23 एप्रिल 2025

घटनेची सविस्तर हकीकत :

तक्रारदार हे प्लंबर असून, दरवर्षी लायसन्स नूतनीकरणासाठी भुसावळ पाणीपुरवठा विभागात भेट देतात. यंदा 23 एप्रिल 2025 रोजी ते विभागात गेले असता, आरोपी क्र.1 शाम साबळे यांनी त्यांच्याकडून पंचासमक्ष 700 रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर शाम साबळे यांनी आरोपी क्र.2 देशमुख यांच्याशी संपर्क साधला. देशमुख यांनी लाच 600 रुपये ठरवली. पुढे आरोपी शाम साबळे यांनी आरोपी क्र.3 सुरवाडे यांच्याशी संपर्क साधून “साहेबांनी पैसे घेण्यास सांगितले” असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारकडील 600 रुपये सुरवाडे यांनी स्वीकारले.

यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी क्र.3 शांताराम सुरवाडे यांना रंगेहाथ अटक केली.

तपास व पुढील कारवाई :

सदर घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपींच्या घरझडती व अंगझडती दरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

आरोपी 1 – Vivo मोबाईल
आरोपी 2 – 2160 रुपये रोख व OnePlus मोबाईल
आरोपी 3 – 1000 रुपये रोख व Vivo मोबाईल

सदर सर्व मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून फॉरेन्सिक विश्लेषणासाठी प्रक्रिया सुरू आहे.—

तांत्रिक पुरावे :

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

कारवाईतील अधिकारी वर्ग :

पर्यवेक्षण अधिकारी : श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव

सापळा व तपास अधिकारी : श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत विभाग, जळगाव

सापळा पथक सदस्य :

  • सहा. पो. उप. नि. सुरेश पाटील
  • सहा. पो. पो. उप. नि. दिनेशसिंह पाटील
  • म. पो. हे. कॉ. शैला धनगर
  • पो. ना. बाळू मराठे
  • पो. कॉ. राकेश दुसाने
  • पो. कॉ. प्रदीप पोळ

मार्गदर्शक अधिकारी :

मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, नाशिक परिक्षेत्र
मोबा. : 9371957391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!