कर्तव्यात कसूर? सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा बर्थडे सेलिब्रेशन!

जळगाव,(प्रतिनिधी)- येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी इम्रान शेख यांनी कार्यालयातचं वाढदिवस साजरा केला असून वाढीवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
वैद्यकीय अधिकारी इम्रान शेख यांनी स्वतःचा वाढदिवस शासकिय कार्यालयात साजरा करुन आणि खाजगी कामानिमित्त कर्मचाऱ्यांनी सामुहिक अनुपस्थित राहून वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना वेठीस धरुन वाढदिवस साजरा करणं, शासकीय कामकाजाच्या वेळेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण महाराष्ट्र नागरि सेवा वर्तणूक नियमांचा भंग आहे. संबंधीतावर कायदेशिर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक स्तरावर आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करणं योग्य ठरत नसतांना शासकीय रुग्णालयात अधिकाऱ्याने वाढदिवस साजरा केला असून कार्यालयाच्या शिस्तीचे उल्लंघन केले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता कारवाई करतील का असा सवाल उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत शासकीय कर्मचारी,अधिकारी यांना वाढदिवस साजरा करणे महागात पडल्याचे अनेक वेळा राज्यात पाहायला मिळाले असतांना वैद्यकीय अधिकारी इम्रान शेख यांना व कर्तव्य सोडून वाढदिवस साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करण्याने कार्यालयीन वेळेचा गैरवापर होतो सरकारी कार्यालयातील वेळ ही सार्वजनिक सेवेकरिता असते. त्यामुळे वाढदिवस साजरा करताना कामकाजात अडथळा येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे तरी अत्यावशक सेवा सोडून वाढदिवस साजरा केल्याने तीव्र संताप करण्यात येत आहे.
निष्कर्ष
शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असते. त्याचा वापर स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींसाठी करणे हा नियमांचा सरळसरळ भंग असून यावर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. अधिष्ठाता तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
.