कवी अनंत राऊत यांचे विशेष व्याख्यान “खान्देश करिअर महोत्सवात”

जळगाव, दि. १० – खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि. १०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सुर्या फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे विशेष सौजन्य लाभणार आहे.
हा महोत्सव शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे भव्य स्वरूपात पार पडणार असून खान्देशासह राज्यातील हजारो विद्यार्थी व पालक सहभागी होणार आहेत.
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम
दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध कवी अनंतराव राऊत यांचे “मैत्री आणि करियर” या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व टिप्स देणार आहेत.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा महोत्सव नक्कीच चुकवू नये!