बातम्या

भव्य विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन सोहळा संपन्न

असोदा (ता. जळगाव) येथे भव्य विश्वकर्मा मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव, उद्योजक विक्रम गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी श्री विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, पंचायत समिती सदस्य तुषार महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, विकासो अध्यक्ष बापू महाजन, उपसरपंच गिरीश भोळे, ग्रामपंचायत सदस्य जीवन सोनवणे, दुर्गादास भोळे, उमेश बाविस्कर, लखन जोहरे, सुनील पाटील तसेच सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन उपस्थित होते.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून बाळकृष्ण पाटील, हरीश भोळे, अनिल कोळी, किशोर चौधरी, शरद नारखेडे, पिंटू कोळी, दीपक माळी, सतीश डोळसे, रामचंद्र कोळी, संजय बिऱ्हाडे, चंदन बिऱ्हाडे, संजय कोळी, ललित कोळी, कैलास चौधरी, महेंद्र कोळी, गोटू नारखडे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

श्री विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण नामदेव शिंदे, सचिव भागवत पुंडलीक साळुंखे, खजिनदार अंकुश आत्माराम पाटील तसेच वसंत खैरनार, भगीरथ साठे, मोहन पद्माकर साळुंखे, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, योगेश मिस्तरी, सचिन साळुंखे, नितेश कापडे, राहुल वडसत्ते यांच्यासह समस्त विश्वकर्मा समाज बांधव आणि असोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भूमिपूजन सोहळ्यामुळे असोदा येथे विश्वकर्मा समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांना अधिक बळ मिळणार आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या मंदिरामुळे गावातील भक्तगणांना एक नवे श्रद्धास्थान लाभणार असून, भविष्यात विविध सामाजिक उपक्रम येथे राबवले जाणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!