बातम्या
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उल्हास 2K25 चे उद्घाटन उत्साहात संपन्न

जळगाव – गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उल्हास 2K25 या स्नेहसंमेलनाचा भव्य शुभारंभ 26 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या चार दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन 26 ते 29 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद आणि कलागुणांची बहार पहायला मिळत आहे.