या कारवाईत एकूण 27 इसमांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातील 10,015 लिटर दारू तयार करण्याचे रसायन आणि 7,01,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ही संपूर्ण गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोंबींग ऑपरेशनमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मोहिमेत 11 पोलीस अधिकारी, 48 पोलीस कर्मचारी, 22 होमगार्ड तसेच RCP आणि QRT पथकांचा समावेश होता.
होळी-धुलीवंदन दरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस सतर्क
सणाच्या काळात काही उपद्रवी प्रवृत्ती दारू सेवन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, यासाठी जिल्हा पोलिसांनी ही मोहीम राबवली. यामुळे अवैध दारू धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.