बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आशिष सपकाळे यांची निवड

जळगाव, 23 फेब्रुवारी 2025: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक पद्मालय रेस्ट हाऊस येथे पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी आयुष्यमान आशिष उत्तमराव सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

प्रबोधनात्मक आणि जल्लोषात जयंती साजरी होणार
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी समाजाला विश्वास दिला की यंदाची जयंती चार दिवसीय कार्यक्रमासह प्रबोधनात्मक आणि जल्लोषात साजरी केली जाईल.

उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड
समितीच्या उपाध्यक्षपदी आयुष्यमान मोनू अडकमोल व सौ. भारतीताई रंधे, तर कार्याध्यक्षपदी मोरे आबा यांची निवड करण्यात आली.

बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
बैठकीस माजी अध्यक्ष राधे शिरसाठ, सतीश गायकवाड, विशाल अहिरे, हरिश्चंद्र सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे व राजू मोरे, 358 ग्रुपचे संस्थापक अजय गरुड, आरपीआय जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, समाजसेवक मुकुंद सपकाळे, विजय सुरवाडे, आरपीआय शहराध्यक्ष मिलिंद सपकाळे, सचिन सरकटे, सागर बांगर, टीना तायडे, समाधान सोनवणे, जितेंद्र केदारे, सुमित अहिरे, अ‍ॅड. अभिजीत रंधे यांसह अनेक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

समाजातील सर्वांनी एकत्र येत कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!