बातम्या

जळगावात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीग – अंतिम सामन्यास मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

  1. जळगाव, : राज्यात प्रथमच जळगावात आयोजित पत्रकार प्रीमियर लीग (JPL) क्रिकेट स्पर्धेचा थरारक अंतिम सामना सध्या जळगावातील शिवतीर्थ मैदानावर रंगला आहे. या विशेष स्पर्धेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली असून, त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांचीही उपस्थिती आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या या स्पर्धेने सर्वांच्या उत्सुकतेला चांगलीच पल्लवित केली आहे.

शेवटच्या टप्प्यात रोमांचक लढत

अंतिम सामना सध्या शेवटच्या टप्प्यात असून, दोन्ही संघ विजेतेपदासाठी जोरदार झुंज देत आहेत. मैदानावर प्रेक्षकांचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “पत्रकार हे समाजातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आणि संघटनासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. भविष्यातही अशा उपक्रमांना पाठबळ मिळेल.”

सामना पूर्ण झाल्यानंतर विजेत्या संघाला बक्षिसे आणि गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!