मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या निश्चित केल्या आहेत. यामध्ये आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात पक्षांनी लक्ष घातले होते. त्यासाठी महत्त्वाचे जिल्हे आपल्या बाजूने असावेत, अशी त्यांची आकांक्षा होती.
या नियुक्त्यांच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. खाली दिलेल्या यादीत संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि त्यांची नियुक्ती दर्शविली आहे:
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
> ठाणे – एकनाथ शिंदे
> पुणे – अजित पवार
> बीड – अजित पवार
> सांगली – शंभूराज देसाई
> सातारा – शिवेंद्रराजे भोसले
> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
> जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
> यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
> कोल्हापूर – हसन मुश्रीफ
> अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
> अकोला – माणिकराव कोकाटे
> अमरावती – चंद्रकांत पाटील
> भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
> बुलढाणा – आकाश फुंडकर
> चंद्रपूर – नरहरी झिरवळ
> धाराशीव – धनंजय मुंडे
> धुळे – जयकुमार रावल
> गडचिरोली – एकनाथ शिंदे
> गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
> हिंगोली – आशिष जैस्वाल
> लातूर – गिरीष महाजन
> मुंबई शहर – योगेश कदम
> मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
> नांदेड – भाजपाकडे राहिल
> नंदुरबार – भाजपाचा दावा
> नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
> वर्धा – पंकज भोयर
> वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
> जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील
नियुक्त्यांचा महत्त्व:
पालकमंत्री नियुक्त्या फडणवीस सरकारसाठी एक महत्त्वाची राजकीय चाल ठरली आहे, कारण या नियुक्त्यांनी महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये समतोल साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी लक्षात घेऊन, प्रत्येक पक्षाने आपले स्वबळ मजबूत करण्यासाठी आपापल्या जिल्ह्यांमध्ये प्रभावी व्यक्ती नियुक्त केल्या आहेत.
महायुतीतील नेत्यांनी यावेळी चर्चेत ठेवले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नियुक्तीचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. प्रत्येक पक्षाने आपल्या इच्छित जिल्ह्यांवर दबाव टाकत त्यांचे लक्ष वेधले आणि त्यानुसार, या नियुक्त्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली.
आशा व्यक्त केली जात आहे की, या नियुक्त्यांमुळे राज्यातील राजकीय समतोल राखला जाईल आणि महायुतीच्या पक्षांना स्थानिक पातळीवर अधिक पाठिंबा मिळवताये ईल.