बातम्या

प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भादली बु. येथे संगीतमय रामायण कथेस प्रारंभ

संगीतमय श्री तुलसी रामायण कथेस प्रारंभ – भादली बु., २८ डिसेंबर २०२४२८ डिसेंबर रोजी भादली बु. येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संगीतमय श्री तुलसी रामायण कथेस प्रारंभ करण्यात आला. या विशेष प्रसंगी ग्रंथ पुजनाचा कार्यक्रम मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.तसेच, गणपती व कलश पूजनाचे महत्वाचे कार्य शिवसेना मिडिया प्रमुख श्री. हितेश नारखेडे आणि सरपंच श्री. मनोज चौधरी यांच्या हस्ते पार पडले. या पवित्र समारंभात मा. सरपंच तसेच ग्राप सदस्य श्री. जितेंद्र नारखेडे, युवासेना उपतालुका प्रमुख श्री. भूषण पाटील, सरपंच श्री. मिलिंद चौधरी, ग्राप सदस्य श्री. छोटू पाटील, तसेच वि का सोसा व्हा चेअरमन श्री. संदीप कोळी, संचालक श्री. राजेंद्र अत्तरदे यांच्यासह मंदिराचे सहकारी श्री. दिनकर झोपे, श्री. विनोद कावळे, श्री. राजू ढाके, श्री. दिलीप पाटील, श्री. मनोज पांगले आणि गावातील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुलसी रामायण कथेस प्रारंभ करताना उपस्थित सर्वांनी भक्ति भावाने श्रीरामाचे स्तवन केले. धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांमध्ये धार्मिक एकता आणि आनंद निर्माण झाला.या कथेत श्रीरामाच्या जीवनातील गोड गोष्टी व संघर्षाचा सुंदर आलेख रंगवला जात आहे. कथेच्या माध्यमातून धार्मिक संदेश आणि समाजप्रेमाची भावना प्रकट केली जात आहे.संगीतमय श्री तुलसी रामायण कथेस आगामी काही दिवसांनी भक्तांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!