“श्री स्वामीनारायण मंदिर, जळगांव: मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल”

जळगांव शहरात दि. १०/१२/२०२४ ते १७/१२/२०२४ दरम्यान श्री स्वामीनारायण मंदिर, जळगांव येथे आयोजित “मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव” संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या कारणास्तव जळगांव जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक, जळगांव यांनी १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३३(१)(बी) नुसार वाहतूक मार्गावर काही ठिकाणी फक्त अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. या बदलामुळे वाहतूक मार्गात काही प्रमुख बदल करण्यात आले आहेत.
या प्रमाणे:
1. भुसावळ कडून धुळ्याकडे जाणारी वाहने:
पर्यायी मार्ग – नाहाटा कॉलेज- जामनेर- नेरी वावडदा म्हसावद एरंडोल मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
2. भुसावळ कडून जळगावकडे जाणारी वाहने:
पर्यायी मार्ग – नाहाटा कॉलेज- जामनेर- नेरी अजिंठा चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
3. धुळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणारी वाहने:
पर्यायी मार्ग – एरंडोल- म्हसावद- वावडदा- नेरी- जामनेर मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
4. जळगाव शहरातून भुसावळ कडे जाणारी वाहने:
पर्यायी मार्ग – अजिंठा चौक- नेरी- जामनेर मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
सकाळी ०७.०० ते रात्री ११.०० या वेळेत ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश दिले आहेत.