बातम्या

एरोंडल मतदार संघात चूरशीची लढत ; समीकरनं बदलल्याने शिवसेनेसाठी वाट बिकट?

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे चिमणराव पाटील आणि डॉ. सतीश पाटील यांच्या दरम्यान लढत अपेक्षित असली तरी, यावेळी परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट तसेच शिंदे गटातील उभ्या-आडव्या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे वेगळी झाली आहेत.यंदाच्या निवडणुकीत चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांना अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यामुळे त्यांची गाडी ‘फिस्कटल्याचे’ बोलले जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाच्या उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवारांची चांगली चुरस पाहायला मिळत आहे.भाजपचे बंडखोर ए.टी. नाना पाटील यांनी देखील या निवडणुकीत उडी घेतल्याने स्पर्धा अधिकच रंगली आहे. युवा नेत्यांपेक्षा अनुभवी नेत्यांकडे मतदारांचा कल असल्याचे दिसत आहे. सध्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे पहिल्या दोन क्रमांकांवर असल्याचे संकेत आहेत.शिंदे गटाचे उमेदवार मात्र यावेळी माघार घेतल्यासारखे दिसत आहेत, आणि चिमणराव पाटील यांनाही जनतेचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्या यशाची शक्यता कमी होत आहे. एरंडोलच्या राजकारणात हा बदल येत्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!