बातम्या
जळगाव ग्रामीण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का

मा.ना गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगांव विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा यांच्या मार्गदर्शन खाली आज जळगांव ग्रामीण मतदार संघातील शिरसोली गावातील असंख्य ग्रामस्थांनी आणि तरुणांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.विजय पाटील अनिल पाटील (मेंबर) भगवान पाटील वसंत मराठे संभाजी पाटील अनिल बोबडे ज्ञानू बोबडे निवृत्ती पाटील सचिन पाटील नवल पाटील नाना पाटील पिंटू माळी भरत पाटील सचिन पाटील उत्तम खडसे भोला खडसे असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील नगरसेवक मनोजभाऊ चौधरी,युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा,उत्तर महाराष्ट्र वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख जितेंद्र गवळी,विशाल निकम,उप महानगर प्रमुख पवन ठाकूर, राहुल गवळी दिपक पाटील उपस्थित होते