बातम्या

एमआयडीसी पोलीसांची कारवाई दोन चोरट्यांसह ट्रक चोरीचा गुन्हा उघड

शेख जावेद शेख कबीर रा विवरा ता रावेर जि जळगाव यांनी सन 2022 मध्ये 10 टायरी 6,50,000/- रुपये किंमतीचा 2515 मॉडेल असलेला ट्रक क्र. एमएच 19 सीवाय 6365 हा भुसावळ येथुन विकत घेतला होता. तक्रारदार हे सदर ट्रक जिथे ट्रीप मिळेल तिथे भाडे ठरवुन घेवुन जात असत. दिनांक 01/09/2024 रोजी तक्रारदार यांनी मध्यप्रदेश येथे ट्रक मध्ये माल घेवुन संबंधीत व्यापारी यांना माल देवुन परत जळगाव येथे येवुन नेहमीप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचा ट्रक हा सुप्रीम कॉलनी जळगाव येथे शालकाचे घराजवळ लावुन विवरा येथे आपले घरी निघुन गेले होते. दिनांक 07/09/2024 रोजी तक्रारदार हे ट्रक घेण्यासाठी सुप्रीम कॉलनी जळगाव येथे गेले असता त्यांना सदर ठिकाणी ट्रक हा लावलेला दिसुन आला नव्हता म्हणुन त्यांनी त्यांचे नातेवाईक यांना ट्रक बाबत माहीती विचारपुस करता काहीएक माहीती नसल्याचे सांगीतल्याने तक्रारदार यांनी त्यांचे नातेवाईक यांचे सोबत मिळुन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून ट्रक चोरी गेल्याबाबत तक्रार दिल्यावरुन पोलीसांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अंमलदार यांना ट्रकचा शोध घेणेकामी सांगुन स्वतः सुध्दा गोपणीय बातमी काढत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपणीय बातमीच्या आधारे माहीती मिळाला की, सदर परीसरातील राहणारे 1) शेबी खान चांद खान, 2) मोहसीन उर्फ गजणी सुभान खान मुलतानी यांचेवर यापुर्वी देखील ट्रक चोरीचे गुन्हे दाखल आहेत व ते ट्रक चोरी गेल्यापासुन परीसरात दिसुन येत नाही. म्हणुन दोन टिम तयार करून शेबी खान चांद खान याला नागपुर मधील कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन ताब्यात घेतले व मोहसीन उर्फ गजणी सुभान खान मुलतानी यास संभाजीनगर येथुन ताब्यात घेवुन दोघांची सखोल चौकशी करता दोघांनी मिळुन तक्रार यांचा 2515 मॉडेल असलेला ट्रक क्र. एमएच 19 सीवाय 6365 हा चोरी करून सदर ट्रकची विल्हेवाट लावल्याबाबत सांगीतल्याने त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवुन दोघांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेवुन पोलीस कस्टडी दरम्यान गुन्हा उघडकिस आणुन त्यांचे कडुन 87,000/-रुपये किमतीचे ट्रक साहीत्य हे हस्तगत करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, मा उपविभागीयपोलीस अधिकारी संदीप गावीत, मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोउनी संजयसिंग पाटील, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, राहुल रगडे, राहुल घेटे, किशोर पाटील, गणेश ठाकरे, नरेंद्र मोरे, नाना तायडे, किरण पाटील, नितीन ठाकरे, योगेश बारी, सिध्देश्वर डापकर, साईनाथ मुंढे, चंद्रकात पाटीलयांनी केलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोउनी संजयसिंग पाटील हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!