जळगाव शहर वाहतूक शाखेने शहरातील वाहनांवर केलेला दंड वसूल..

जळगाव शहर वाहतूक शाखेने शहरातील वाहनांवर केलेला दंड वसूल करण्यासाठी 650 नोटीस बजावून त्यापैकी सात दिवसांमध्ये 15 लाख 39 हजार 650 रुपयांचा दंड वसूल केला आहे .आजपर्यंतच्या कार्यकाळात इतक्या कमी वेळेत एवढा मोठा रकमेमध्ये दंड वसूल करण्याची ही पहिली वेळ शहर वाहतूक शाखा जळगावची आहे.शहर वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड टाकलेला आहे मात्र नागरिकांनी वाहनावरील दंड न भरल्यामुळे वाहतूक शाखेने वाहनधारकांना नोटिसा बजाविल्या होत्या.जळगाव शहरात वाहतूक शाखेने 6500 नोटीस वाहन धारकांना दिले होत्या त्यापैकी 22 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत म्हणजे सात दिवसांमध्ये 2510 वाहनधारकांनी त्या वाहणारा असलेला दंड भरला सात दिवसांमध्ये पंधरा लाख 39 हजार 650 रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेने वसूल केला.येत्या काळात शहर वाहतूक शाखेने गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात थकीत असलेला दंड व वाहनांवर एक पेक्षा जास्त असलेल्या दंड ज्या वाहनधारकांनी भरलेला नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.जवळपास 1 लाख वाहन धारकांना नोटीस देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.