क्राईम

गॅस भरण्याची मशीन, वजनकाटा, मुद्देमाल जप्त करुन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दिनांक 30/09/2024 रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्ष श्री. बबन अव्हाड सो स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना गोपनिय माहीती मिळाली होती की, सादीक सिराज पिजारी वय- 41 रा मलिक नगर, शिरमोली प्र.न. ता.जि. जळगांव हा त्याचे राहते घराचे कंपाऊड मधील मोकळ्या जागेत मानवी जिवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्याक्तीस दुखापत अगर नुकसान पोहचण्याचा संभव निर्माण होईल अशा पध्दतीने ज्वलनशील अशा भारत गॅस, एच.पी. गॅस, इंडियन गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेन्डर या बेकायदेशीर रित्या जिवनावश्यक वस्तु गॅस सिलेडर याचा साठा करुन खाजगी वाहना मध्ये भरुण देण्याच्या उद्देशाने गॅस सिलेंडर अशा जिवनावश्यक वस्तु कब्जात बाळगत असेल बाबतची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दुपारी 12/00 वा. सु।। सादीक सिराज पिजारी हा सदर मुद्देमालसह मिळुन आला होता. म्हणुन त्याचेवर कारवाई करण्यात येऊन त्याचे कडुन भारत, एच.पी. व इंडियन कंपनीचे असे एकुण 73 नग घरगुती वापराचे व व्यावसायीक सिलेंडर तसेच व्यावसायीक सिलेंडर असलेली अॅपेरिक्षा क्रमांक MH 19 BM 2784 व गॅस भरण्याची मशीन, वजनकाटा असे एकुण 5.29.600/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचे विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपी म।। याला अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन अव्हाड सो, पो.उपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ/अतुल वंजारी, पोहेको/हरीलाल पाटील, पोहेकॉ विजय पाटील, प्रदिप चवरे, ईश्वर पाटील, अशानी केली आहे. पुढील तपास श्रेणी. पोउप निरी राजेद्र उगले करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!