बातम्या
शिवसेना सोशल मीडिया जळगाव लोकसभा प्रमुख पदी राकेश चौधरी यांची नियुक्ती

जळगाव,(प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोशल मीडिया जळगांव लोकसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास शिवसेना-सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनल,उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांनी व्यक्त केला आहे..