बातम्या

गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून अश्यां लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले.

मा.श्री. बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, श्रेपोउनि श्री अनिल जाधव, पोह दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुहास बावीस्कर, रा.कानळदा ता.जि.जळगाव हा त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) घेवून दहशत माजविण्याचे उद्देशाने देवगाव ता. पारोळा येथे आल्याची बातमी मिळाली. त्यावरून देवगाव शिवार ता. पारोळा येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून सुहास बावीस्कर यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुहास भरत बावीस्कर, वय ३८, रा. कानळदा ता.जि.जळगाव असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात १५,०००/- रु. कि.चे १ गावठी बनावटीची पिस्टल व ४,०००/- रु. कि.चे २ जिवंत काडतुस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पारोळा पो.स्टे.CCTNS NO २९२/२०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!