बातम्या

दोन सख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार ; धरणगाव पोलिसांकडून नराधमाला अटक !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अल्पवयीन दोन सख्या बहिणीवर एका नराधमाने दोन वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधमाला अटक करण्यात आले असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला (रा.मध्यप्रदेश ह.मू. सावदा ता.एरंडोल), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात मध्य प्रदेशातील कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबात 11 वर्षीय व तेरा वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी वास्तव्याला आहे. या परिसरात राहणारा संशयित आरोपी विनोद बारेला हा देखील राहतो. 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात मोठी खडबड उडाली आहे. अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी दिली. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर उंबरे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!