सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांचा रूट मार्च

यावल,(प्रतिनिधी)- गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यावल शहरातील मुख्य मार्गांवरून यावल पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांनी आज दिनांक ७ रोजी 17:00 ते 18:00 वा. दरम्यान रूट मार्च काढला विसर्जन मिरवणूक मार्ग व संवेदनशील भागात मिश्रवस्तींमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाचे अनुषंगाने रूट मार्च काढण्यात आला आला.यावेळी ASP. श्रीमती अन्नपुर्णा सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपुर भाग यांची उपस्थिती होती तर पोनि.प्रदीप ठाकूरसपोनि. विनोदकुमार गोसावीपोउपनि. सोपान गोरे, सुनिल मोरे,मुजफ्फर खान सफौ.अस्लमखानपोहेका मराठे,पोका.अनिल साळुंके ,गोपनीय शाखा पोका.योगेश गोसावी, गोपनीय शाखा,होमगार्ड तालुका समादेशक विजय जावरे, ASP १, फैजपुर भाग पोनि १,सपोनि १,पोउनि ३,पो अं. १५ SRPF- psi 1 अं. 24,होमगार्ड ३० आदी सहभागी झाले होते.