वाघाची कातडी विकणाऱ्या सहा जणांना अटक
पुणे कस्टम व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई
जळगांव

जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्या जवळ वाघाची कातडी विकणाऱ अशी माहिती पुढे व जळगाव कस्टमर अधिकाऱ्यांना मिळाली होती या संयुक्त कारवाईत वाघाची कातडी व सहा आरोपी दोन मोटरसायकल पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव प्रादेशिक हे करीत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की
२६ रोजी जळगांव वनपरिक्षेत्रातील नशिराबाद टोल नाका येथे पुणे कस्टम अधिकारी व जळगांव कस्टम अधिकारी यांना मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यानी केलेल्या संयुक्त कार्यवाही दरम्यान वाघ या प्राण्यांची कातडी ही आरोपी १) अजवर सुजात भोसले उ.व-३५ रा.हलखेडा ता. मुक्ताईनगर ह.मु. चांगदेव २) मोहमंद अतहर खान उ.व-५८ रा. भोपाल जि. भोपाल (मध्यप्रदेश) ३) नदीम गयासुद्दीन शेख उ.व-२६ रा. अहमदनगर जि. अहमदनगर ४) ककंगनाबाई अजवर भोसले उ.व- ३० रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव ५) तेवाबाई रहीम पवार उ.व-३५ रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव ६) रहिम रफिक पवार उ.व-४० रा.हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांच्या ताब्यातुन जप्त केली. या गुन्हयात वापरण्यात आलेले मोबाईल ०५ व मोटार सायकल संख्या-०२ व इतर साहित्य कस्टम अधिकारी पुणे विभाग श्री. रविरंजन व त्यांचे सहकारी तसेच कस्टम अधिकारी जळगांव विभाग . शाम कोटावळे यांच्या मार्फत जप्त करण्यात आले.
पुढील अधिक तपास कामी सिमा शुल्क विभाग पुणे व जळगांव यांनी वरील कारवाई बाबत . उपवनसंरक्षक, जळगांव वनविभाग जळगांव यांना सुचित केले असता, सदर माहितीच्या आधारावर वरील सहा आरोपीना जळगांव वनविभागाकडून अटक करण्यात आलेली आहे.
वाघाची शिकार कुठे झाली? आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती? याचा तपास सुरू आहे. सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. प्राथमिक माहिती च्या आधारे वाघाची मध्यप्रदेशात शिकार केल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या वाघ शिकार प्रकरणाच्या तपासाबाबत उप वनसरंक्षक जळगाव प्रवीण ए. हे मध्य प्रदेश वन विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या संपर्कात आहेत.
सदर आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन गुन्हयातील पकडण्यात आलेली कातडी हि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सुची-१ मध्ये येत असून सदर कृत्य हे दंडनिय अपराध आहे. सदर वनगुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. सदर वनगुन्हाची पुढील चौकशी नीनु सोमराज, वनसंरक्षक धुळे, श्री. प्रविण ए., उपवनसंरक्षक जळगांव, आर. आर. सदगीर, विभागीय वनाधिकारी (दक्षता) धुळे, यांचे मार्गदर्शनाखालील उ.म. बिराजदार, सहा. वनसंरक्षक जळगांव व नितीन अशोकराव बोरकर , वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव प्रादेशिक हे करीत आहे. सदर कार्यवाही . विवेक देसाई यांचे उपस्थितीत केली.
तरी जळगांव वनविभागा मार्फत नागरीकाना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैधरित्या वन्यप्राणी ताब्यात ठेवून नये. त्यांची खरेदी अथवा विक्री करुन नये, असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक. १९२६ वर संपर्क करावा,