जळगाव मध्ये होणार तक्रार निवारण दिन चे आयोजन

दिनांक ०६/०७/२०२४ रोजी सायंकाळी ११/०० वाजता ते १४/०० वाजता पावेतो मंगलम हॉल पोलीस मुख्यालय, ग्राउंड जवळ जळगांव येथे जळगांव उपविभागातर्फे ” तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ” तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” दिनाचे दिवशी श्री संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, जळगांव तसेच जळगांव उपविभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार हे उपस्थित राहणार आहे.
तरी जळगांव उपविभागातील (जळगांव शहर, शनीपेठ, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगांव तालुका, रामानंदनगर) पोलीस स्टेशन हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील राहणारे नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारींचे अडीअडचणी असल्यास दिनांक ०६/०७/२०२४ रोजी ११/०० वाजता ते १४/०० वाजता पावेतो मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंडजवळ जळगांव येथे हजर राहावे.