बातम्या

लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले |shree Marathi creators

जळगाव,: रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना १० हजारांची लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात आज (दि.१२) पकडले. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६) असे कारवाई झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारा कवरनगर सिंधी कॉलनी जळगाव येथील तक्रारदाराविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची इर्टिगा गाडी जप्त करण्यात आली होती. तक्रारदार यांची जप्त केलेली गाडी सोडून देण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी कैलास ठाकूर यांनी केली होती. परंतु लाचेची रक्कम तडजोडी अंती १० हजार करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर १० हजारांची लाच घेताना ठाकूर यांना रंगेहात पकडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!