राजकारण

नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोण कोण शपथ घेणार? यादी आली समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळची निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत राहिली. एनडीए पुढे इंडिया आघाडीनं तगडं आव्हान उभं केलं.

भाजपकडून या निवडणुकीत चारशे पारचा नारा देण्यात आला होता. मात्र प्रत्येक्षात भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे आता सत्ता स्थापनेमध्ये एनडीएतील इतर घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मंत्रिपदासाठी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. त्यामुळे कोणाला आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे हे नेते बनू शकतात मंत्री

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या नेत्यांची नाव आता समोर आली आहे. भाजप नेते नितीन गडकरी, अमित शाह, प्रल्हाद जोशी, जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकुर, सर्वानंद सोनोवाल, चिराग पासवान, अर्जून राम मेघवाल, जीतेन राम मांझी, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल आणि एचडी कुमार स्वामी यांना आतापर्यंत दिल्लीतून मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान शपथग्रहण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी इंडिया गेट परिसरात असलेल्या राष्ट्रीय शैर्य स्मारकाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्तानं दिल्लीच्या चौका चौकात नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले आहेत.

पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन 

मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!