राजकारण
अमित शाहंच्या आग्रहामुळे घरवापसीचा निर्णय

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता; पण एप्रिल महिन्यात अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मला फोन आला आणि त्यांनी ‘भाजपात या, सोबत काम करायचे आहे’ असा आग्रह धरला. त्यामुळे मी दिल्लीत गेलो आणि त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचे मफलर गळ्यात टाकून पक्षप्रवेश करवून घेतला आहे. भाजपमध्ये जाण्याची आपल्याला घाई नाही, असे विधान नुकतेच खडसे यांनी माध्यमांकडे केले होते.