क्राईम

सराईत गुन्हेगार भुषण माळी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध

एम.आय.डी.सी. पो.स्टे. चे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार नामे भुषण उर्फ भासा विजय माळी, वय 24 वर्ष, रा. भुई काटयाच्या मागे, तुकारामवाडी, जळगाव याचेवर शरीराविरुध्द चे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तुकारामवाडी, जळगाव परीसरात प्रचंड दहशत होती. त्याच्या व त्याच्या टोळीच्या नावाची दहशत व्हावी याकरीता तो सामाण्य नागरीकांना विनाकारण मारहाण करुन शिवीगाळ करायचा.

त्याच्यावर एकुण 13 गुन्हे दाखल आहेत. त्याचेवरील दाखल गुन्हयांचा आलेख पाहता त्याला यापुर्वी दोन वर्षाकरीता हद्यपार करण्यात आले होते. त्याचे हद्यपारी नंतर त्याने पुन्हा त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले व तुकारामवाडी परीसरात त्याचे गुन्हेगारी साथीदारांसह एका घरात घुसुन तोडफोड केलेली होती व दहशत निर्माण केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा बसावा याकरीता त्याचे विरुध्द एम.आय.डी.सी. पो.स्टे. कडुन एम.पी.डी.ए. कायद्यार्तगत स्थानबध्द होणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो. यांचे कडेस प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांचेकडुन सदरचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी सो., जळगाव यांचेकडेस पाठविण्यात येवुन दिनांक 30/05/2024 रोजी मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद सो यांनी भुषण माळी यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे स्थानबध्द करणेबाबत आदेश पारीत केला होता. सदरचा आदेश प्राप्त झाल्यानंतर भुषण माळी यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.


सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत सो., मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किसन नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, पो.उप.निरी. दिपक जगदाळे, पो.उप. निरी. दत्तात्रय पोटे, स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, विनोद बोरसे, छगन तायडे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे तसेच स्था.गु.शा. चे स. फौ. युनुस शेख, पो.हे.कॉ. सुनिल दामोदर, मिलींद जाधव, वैभव पाटील अशांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!