बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत घडला मोठा अपशकून !

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळीकडे प्रचार ज्वर शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या सभांनी नुसता धुरळा उडवून दिला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी मतदारांचीही चांगलीच करमणूक होताना दिसते आहे. जळगाव जिल्ह्यातही त्याचा प्रत्यय येत असताना, भुसावळमध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना, अचानक मोठा अपशकून घडला. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा देखील आहे.



देवेंद्र फडणवीस तसे पट्टीचे वक्ते, ते बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर मध्ये कुठेच थांबा न घेता नॉनस्टॉप बोलतच राहतात. भुसावळमध्ये महायुतीच्या रावेर मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेतही त्यांचे जोरदार भाषण सुरु होते. मात्र, ते बोलत असताना मोठा अपशकून यावेळी झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना काहीक्षण आपले भाषण थांबवावे लागले. त्यांना समोरचे कोणीच दिसत नव्हते आणि समोरच्यांना ते दिसत नव्हते, अशी परिस्थितीत तिथे निर्माण झाली होती. सुदैवाने उपस्थितांनी प्रसंगावधान राखून मोबाईलचे लाईट लावले आणि पुढील बाका प्रसंग टळला.

भुसावळपासून जवळच दीपनगरला मोठा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे, त्यामुळे शक्यतो भुसावळमधील वीज पुरवठा खंडीत होत नाही. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करत असतानाच भुसावळची बत्ती गूल झाली. परिणामी, फडणवीसांच्या भाषणात काहीकाळ व्यत्यय देखील आला. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वतः सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “तुमच्या मोबाईलचे लाईट सुरू झाले आहेत. आपला करंटच असा आहे की लाईटची आवश्यकता नाही,” असे त्यांनी म्हटले. तसेच “काय सुंदर दृश्य आहे बघा, हमको रोक सके ये किसी अंधेरेमें दम नही, रोशनी हमसें है रोशनी से हम नहीं.” असाही शेर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!