गणेश विसर्जन 2025: जळगाव पोलिसांची वाहतुकीसाठी मोठी तयारी
जळगावात 6 सप्टेंबरला मोठा वाहतूक बदल

जळगाव :
यंदा श्री गणेशोत्सव बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ ते शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. जळगाव शहरातील सार्वजनिक, खाजगी तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मेहरूण तलाव येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी, म्हणजेच शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी, विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे नियमनाचे आदेश काढले आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१)(बी) अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, विसर्जनाच्या दिवशी सकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री १२.०० वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल लागू राहतील.
वाहतूक बंदी व पर्यायी मार्ग
१. जळगाव ते पाचोरा – एस.टी. बसेस व अवजड वाहनांसाठी
-
ईच्छादेवी चौकी – डिमार्ट – मोहाडी रोड – Y पॉईंट – गायत्री नगर गणेश घाट – सेंट टेरीसा स्कूल – हॉटेल ग्राप्पेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड
या मार्गावरील सर्व एस.टी. बसेस आणि अवजड वाहने दिवसभरासाठी बंद राहतील.
२. जळगाव ते पाचोरा – मध्यम व हलक्या वाहनांसाठी
-
वरीलच मार्ग (ईच्छादेवी चौकी – डिमार्ट – मोहाडी रोड – Y पॉईंट – गणेश घाट – शिरसोली रोड) हलकी व मध्यम वाहने यांच्यासाठीही बंद राहील.
३. जळगावकडून पाचोराकडे जाणाऱ्या कार व दुचाकीसाठी पर्यायी मार्ग
-
आकाशवाणी चौक – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संत गाडगेबाबा चौक – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोल पंप (G मॉल) – मलंगशहा बाबा दर्गा मार्गे – पाचोरा
४. पाचोराकडून जळगावकडे येणाऱ्या कार व दुचाकीसाठी पर्यायी मार्ग
-
मलंगशहा बाबा दर्गा – गुरू पेट्रोल पंप (G मॉल) – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – संत गाडगेबाबा चौक – महाबळ चौक – काव्यरत्नावली चौक – आकाशवाणी चौक – जळगाव शहर
५. आसोदा-भादली मार्गावरील एस.टी. बसेस व इतर वाहने
-
या वाहनांसाठी मार्ग: मोहन टॉकीज – गजानन मालुसरे नगर – जुने जळगाव – लक्ष्मी नगर – कालंका माता मंदिर मार्ग – महामार्ग – अजिंठा चौक – आकाशवाणी चौक – नवा बस स्टँड
६. पाचोराकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
-
वावडदा – नेरी – अजिंठा चौक मार्गे – जळगाव
नागरिकांना आवाहन
पोलिसांनी शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना विनंती केली आहे की, ६ सप्टेंबर रोजी ठरविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी, आवाज, आणि कायदा सुव्यवस्थेची काळजी घेण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
— जळगाव जिल्हा पोलीस दल