बातम्या

13 नगरसेवकांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ,भाजपच्या वाटेवर

गिरीश महाजन यांचा राजकीय डाव जळगावात,ठाकरे गटाचे १३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर

जळगाव प्रतिनिधी | श्री मराठी न्यूज  जळगाव महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील दोन माजी महापौरांसह तब्बल १३ नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आज नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात भाजपप्रवेशाच्या तारखेवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मनपा निवडणूक २०१८ मध्ये भाजपने ५७ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. यंदा भाजपने ७० जागांचे लक्ष्य निश्चित केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विजयाची क्षमता असलेल्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम भाजपकडून जोरात सुरू आहे.

गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात मोठं इनकमिंग!

🔸 बैठकीचे ठिकाण व नेत्यांची उपस्थिती

जळगावातील माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या फॉर्म हाऊसवर ही बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना ठाकरे गटाचे सर्व १३ नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे, भाजप आणि शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

🔸 भाजपप्रवेशाची अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट नाही

सध्या तरी या नगरसेवकांचा भाजपप्रवेश अद्याप अधिकृतरीत्या घोषित झालेला नाही. मात्र माजी महापौर नितीन लड्डा यांनी स्पष्ट केले की, “सुरेश दादा जैन यांच्या निर्णयानुसार पुढील दिशा निश्चित होईल. आमचे सर्व निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेतले जातात.”

राजकारणात हवा करायचीये? मग

🔸 शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका

या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जळगाव महापालिकेत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद अधिक बळकट होणार आहे, तर ठाकरे गटाला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागणार आहे.

🔸 राजकीय चर्चा तेजीत

या घडामोडींमुळे जळगावमधील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी होणारा हा पक्षप्रवेश भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!