बातम्या

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० कोटींचा महाघोटाळा – माजी चेअरमन गुलाबराव देवकर यांच्यावर गंभीर आरोप!

जळगाव: शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेतून १० कोटींचा गैरव्यवहार करत, पदाचा दुरुपयोग करणारे गुलाबराव बाबुराव देवकर हे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याच्या मार्गावर आहेत! बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक असलेल्या देवकर यांनी बँकेच्या निधीचा वापर करून स्वतःच्या संस्थेच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपये सायफन केल्याचा गंभीर आरोप आहे. सहकार विभाग आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल झाली असून, तातडीने चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

बँकेच्या पैशांचा स्वतःच्या संस्थेसाठी गैरवापर

१३ मार्च २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्रीकृष्ण शैक्षणिक सहकारी संस्था, जळगाव या संस्थेसाठी कर्ज मंजुरीचा ठराव संमत करण्यात आला. पण प्रत्यक्षात श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव या वेगळ्या संस्थेच्या नावाने रु. ३ कोटींची रक्कम उचलण्यात आली आणि ती सायफन करून अपहार करण्यात आला!

१० कोटींच्या घोटाळ्याची सूत्रधार कोण?

  1. देवकर यांनी रु. ७ कोटींची अतिरिक्त रक्कमही त्यांच्या संस्थेच्या नावाने उचलली, आणि एकूण १० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
  2. बँकेच्या ऑडिट रिपोर्टमध्येही हा घोटाळा स्पष्टपणे नमूद करण्यात आला असून, बँकेच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे दाखवले आहे.
  3. बँकेच्या संचालकपदाचा गैरवापर करून स्वतःच्या संस्थेला कर्ज मिळवून दिले, जे सरळसरळ बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम २० चा भंग आहे.
  4. रक्कम उचलताना कोणत्याही अटी-शर्तींचे पालन न करता मनमानी करण्यात आली आहे.
  5. मेडिकल कॉलेज उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि कागदपत्रे सरकारकडे सादर केली नसतानाही बँकेने निधी मंजूर केला.

शेतकऱ्यांना फसवून बँकेचा पैसा लुटला!

  • सहकार विभागाच्या स्पष्ट आदेशानुसार १ ऑगस्ट २०१७ नंतर शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज लागू न करण्याचे निर्देश असतानाही बँकेने त्याचे पालन केले नाही!
  • शेतकऱ्यांकडून बेकायदेशीररीत्या व्याज वसूल करून लुट सुरू ठेवली गेली आहे.
  • बँक शेतकऱ्यांकडून थोडेसे कर्जही तगादा लावून वसूल करते, पण देवकर यांच्या बाबतीत मात्र कुठलाही कायदेशीर दंड किंवा कारवाई करण्यात आलेली नाही!
  • मनमानी कारभाराविरोधात झुरखेडा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांनी जाहीर निषेध नोंदवला आणि व्याजवसुली थांबवण्याचा ठराव संमत केला.

देवकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावी!

  • १० कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याने सहकार विभाग आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे.
  • गुलाबराव देवकर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप दाखल करावेत.
  • त्यांना तातडीने सहकार क्षेत्रासाठी अपात्र घोषित करावे, जेणेकरून भविष्यात असे घोटाळे होणार नाहीत.
  • बँकेच्या सर्व माजी आणि विद्यमान संचालकांचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • शेतकऱ्यांच्या पैशांची अफरातफर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे.

 

गुलाबराव देवकर यांना अटक करण्याची जोरदार मागणी!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी चेअरमन गुलाबराव देवकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी केली आहे.

एस. जी. पाटील यांनी सहकार आयुक्त, पुणे तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करून देवकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या नियमांची पायमल्ली करून करोडोंचा गैरव्यवहार झाल्याने देवकर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आर्थिक अपहाराचे गंभीर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर, त्यांनी सहकार विभागाकडे मागणी केली आहे की, देवकर यांना तातडीने सहकार क्षेत्रातील कोणत्याही पदासाठी अपात्र घोषित करावे आणि घोटाळ्याची रक्कम (१० कोटी रुपये) तातडीने व्याजासह वसूल करण्यात यावी.

शेतकऱ्यांकडूनही संतप्त मागणी!

बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा गैरवापर झाल्यामुळे शेतकरी संघटनांनीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला आहे. झुरखेडा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने देवकर यांना अटक करण्याची मागणी केली असून, तातडीने चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावर प्रशासन काय पाऊले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

सहकार क्षेत्रात मोठा भूकंप – शेतकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या देवकरांना वाचवणार कोण?

या प्रकरणामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे पैसे वापरून मोठे गैरव्यवहार करणाऱ्या बड्या व्यक्तींवर कारवाई होते का, की पुन्हा एकदा राजकीय प्रभावाखाली हे प्रकरण दडपले जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!